जादूचा चौरस

*‘जादूचा चौरस’*

हा रामानुजन यांचा आवडता उद्योग. जन्मदिनांक, महिना व वर्ष यांचा उल्लेख आहे. प्रत्येक रांगेतील अंकांची उभी, आडवी वा कर्णाच्या दिशेने येणारी बेरीज १३९ होते.

२२ १२ १८ ८७
२१ ८४ ३२ ०२
९२ १६ ०७ २४
०४ २७ ८२ २६

रामानुजन आजारी असताना प्रा. हार्डी हे इंग्लंडच्या ‘पुतनी रुग्णालयात’ भेटण्यास गेले व म्हणाले, ‘मी १७२९ क्रमांकाच्या टॅक्सीने आलो. हा अंक अशुभ आहे कारण त्यास तेरा या अशुभ अंकाने भाग जातो.’ त्यावर रामानुजन म्हणाले, ‘हा फार रंजक व महत्त्वपूर्ण आकडा आहे. हा अंक दोन घनांची बेरीज दोन प्रकारे करून येणारा सर्वात लहान अंक आहे.’

(१०)३ + (९)३ = १००० + ७२९ = १७२९
(१२)३ + (१)३ = १७२८ + १ = १७२९

तेव्हापासून सारे जग १७२९ ला *‘रामानुजन अंक’* म्हणून ओळखू लागले.

टिप्पण्या