कोणता वार



फेब्रुवारी 2016 मध्ये सोमवार हा पाच वेळा आला असेल तर 5 फेब्रुवारी रोजी कोणता वार असेल ?

*स्पष्टीकरण :-*
महिन्याच्या 1,2, व 3तारखेला जे वार असतात तेच वार 29, 30,व 31 ला देखील असतात

फेब्रुवारी 2016 हे लिप वर्ष असल्याकारणाने 29 दिवसांचा असेल म्हणजेच सोमवार 5 वेळा आले
1 फेब्रुवारी ला ही सोमवारच असणार

5 फेब्रुवारी ला कोणता वार?
सोमवार + 4= *शुक्रवार असणार*

-----------------------------------------



1 जानेवारी 1901 ला कोणता वार असेल ?


*स्पष्टीकरण:-*

1 जानेवारी 1901 दिवस?

म्हणजे,

(1900 वर्षे आणि 1 दिवस)

आता, 1600 वर्षांचे 0  विषम दिवस आहेत

300 वर्षांनी 1 विषम दिवस असतो
(1600 + 300 = 1900)

म्हणून,

1900 वे वर्ष लिप वर्ष नाही  म्हणजे 365 दिवस येतात

{म्हणजेच 1900 या वर्षाचे विषम दिवस = 365/7= 1}


1 जानेवारी म्हणजे

1 दिवसात  1च विषम दिवस असेल

म्हणून,


एकूण विषम दिवस
= 1600 + 300 + 1901
=0 + 1 + 1
= 2 दिवस

0 दिवस म्हणजेच रविवारचा दिवस

रविवार + 2 = मंगळवार

म्हणून,

 1 जानेवारी 1901
 रोजीचा दिवस *मंगळवार* होता.

टिप्पण्या