- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
[ *कोन आणि त्रिकोण*]
🔵 *कोन* 🔵
🔮 {1} *कोन* : जेंव्हा दोन किरणांचा आरंभबिंदू एकाच असतो तेंव्हा ते दोन किरण कोन तयार करतात.
प्रत्येक कोनाला 1 शिरोबिंदू व दोन किरणे असतात.
🔮 {2} *कोनांचे प्रकार* : (1) *लघुकोन* = ज्या कोणाचे माप 0 अंशापेक्षा जास्त व 90 अंशापेक्षा कमी असते त्यां कोनाला *लघुकोन* म्हणतात.
🔮 (2) *काटकोन* = 90 अंशाच्या कोनाला *काटकोन* म्हणतात
🔮(3) *विशालकोन* = ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा कमी असते त्या कोनाला *विशालकोन* म्हणतात.
🔮 (4) *सरळकोन* = ज्या कोनाचे माप 180 अंश असते त्या कोनाला *सरळकोन* म्हणतात.
🔮 (5) *कोटिकोन* = जेंव्हा दोन कोनांची बेरीज 90 अंश असते तेंव्हा ते दोन कोन एकमेकांचे *कोटीकोन* असतात.
🔮 (6) *पूरककोन* = जेंव्हा दोन कोनांची बेरीज 180 अंश असते तेंव्हा ते दोन कोन एकमेकांचे *पूरककोन* असतात.
🔮 (7) *संलग्न कोन* =जेंव्हा दोन कोनांचा एक शिरोबिंदू आणि एक भुजा सामाईक असते आणि उरलेल्या दोन भुजा सामाईक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात तेंव्हा त्या दोन कोनांना *संलग्न कोन* म्हणतात.
🔵 *त्रिकोण* 🔵
🔮 {1} *त्रिकोण* = तीन बाजू असलेल्या बंद आकृतीला *त्रिकोण* म्हणतात.
त्रिकोणाला 3 शिरोबिंदू , 3 बाजू, 3 कोन असतात.
🔮 {2} *त्रिकोणाचे प्रकार*
( *कोनांवरून*) ::
(1) *लघुकोन त्रिकोण* = ज्या त्रिकोणाचे तीनही कोन लघुकोन असतात तेंव्हा त्या त्रिकोणाला *लघुकोन त्रिकोण* म्हणतात.
🔮 (2) *काटकोन त्रिकोण* = एक कोन काटकोन असतो.
🔮 (3) *विशालकोन त्रिकोण* = या त्रिकोणाचा एक कोन 90 अंशापेक्षा जास्त व 180 अंशापेक्षा लहान असतो.
{3} *त्रिकोणाचे प्रकार*
( *बाजुंवरून* )
🔮 (1) *समभूज त्रिकोण* = तिन्ही बाजू समान व तिन्ही कोन समान म्हणजेच 60 अंशाचे असतात.
🔮 (2) *समद्विभूज त्रिकोण* =दोन बाजूंची लांबी समान असते. समान लांबीच्या बाजूंसमोरील कोन सारख्या मापाचे असतात.
🔮 (3) *विशालकोन त्रिकोण* = तीनही बाजू सारख्या नसतात. तीनही कोन सारखे नसतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा