मराठी महिने गीत

*चैत्र* नेसतो सतरा साड्या
*वैशाख* ओढतो
 व-हाडाच्या गाड्या
*ज्येष्ठ* बसतो पेरित शेती
*आषाढ* धरतो छत्री वरती
*श्रावण* लोळे गवतावरती
*भाद्रपद* गातो गणेश महती
*आश्विन* कापतो आडवे भात
*कार्तिक* बसतो दिवाळी खात
*मार्गशीर्ष* घालतो शेकोटीत लाकडे
*पौषा* च्या अंगात उबदार कपडे
*माघ* करतो झाडी गोळा
*फाल्गुन* फिरतो जत्रा सोळा
वर्षाचे महिने असतात बारा
प्रत्येकाची न्यारीच त-हा।

टिप्पण्या