फिबोनाच्ची क्रम :

फिबोनाच्ची क्रम : फिबोनाच्ची दिवस २३ नोव्हेंबर
गणित हा जितका क्लिष्ट विषय आहे तितकाच मनोरंजक आहे, जसे π ची exact व्हॅल्यू किती, नऊ चा पाढा (नऊ च्या पाढयातील प्रत्येक संख्येतील अंकाची बेरीज नऊच येते). तशीच अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे फिबोनाच्ची क्रम (fibonacci series) ह्या क्रमामधील पहिल्या दोन संख्यांची बेरीज ही तिसरी संख्या असते उदा.
0, 1 ,1, 2, 3 ,5, 8 ,13, 21,34,55,89.......... (0+1=1,1+1=2,1+2=3,2+3=5,3+5=8.....)
आता जर या संख्यांच्या लांबी रुंदीचे चौरस काढले आणि त्यातून जाणारा curve काढला तर एक स्पायरल तयार होतो (चित्र १) आणि अश्या प्रकारचे स्पायरल निसर्गात भरपूर ठिकाणी आढळतात जसे सूर्यफुलाच्या बियांच्या रचना , अननसच्या कवचाची रचना ,सश्यांचे प्रजनन इ. आहे की नाही मजा या फिबोनाच्ची क्रमाची.
मध्ययुगीन युरोपात या क्रमाचा शोध लिओनार्डो फिबोनाच्ची याने लावला म्हणून याला फिबोनाच्ची क्रम म्हणतात. परंतु भारतीयांना याचे ज्ञान पूर्वीपासून होते.
आज हे आठ्वण्याचे कारण म्हणजे 23 नोव्हेंबर हा फिबोनाच्ची दिवस असतो .

टिप्पण्या