धडा 1 संख्या व संख्यांचे प्रकार

8 वि गणित
धडा 1 संख्या व संख्यांचे प्रकार

1) समसंख्या- एककस्थानी 0,2,4,6,8 अंक येतात

2) विषमसंख्या - एककस्थानी 1,3,5,7,9 अंक येतात

3) संख्याचे प्राथमिक नियम

समसंख्या+समसंख्या =समसंख्या
समसंख्या-समसंख्या =समसंख्या
समसंख्या +विषमसंख्या=विषमसंख्या
समसंख्या-विषमसंख्या= विषमसंख्या
विषमसंख्या+विषमसंख्या=समसंख्या
विषमसंख्या-विषमसंख्या=समसंख्या

4) मुळसंख्या
2,3,5,7,11.....

1 ते 100 मध्ये एकूण 25

*4422322321*

हे अंक लक्षात ठेवा म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या 10 टप्प्यातील मूळ संख्या सांगता येतील
उदा 1ते 10 मध्ये 4 मुळसंख्या आहेत
11 ते 20 मध्ये 4 याप्रमाणे पुढे

5) जोडमुळ संख्या

ज्या दोन मूळ संख्यात केवळ 2 चा फरक असतो त्यांना जोडमुळ संख्या म्हणतात. 1ते 100 मध्ये 8 जोडमुळ संख्याच्या जोड्या आहेत

6) संयुक्त संख्या :
ज्या संख्या मूळ नाहीत
1ते 100 मध्ये 74 संख्या आहेत

1 ही संख्या मूळ पन नाही आणि संयुक्त पण नाही

टिप्पण्या