चौकोन आकृती

चौकोन आकृती
चौकोन चौकोनाचे प्रकार व गुणधर्म Types of Quadrilaterals चौकोनाचे प्रकार {Types of Quadrilaterals}
1.चौरस :- (Square) ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक कोन काटकोन असतो त्या चौकोनास चौरस म्हणतात. चौरसाचे गुणधर्म ::-- 1. चौरसाचे कर्ण एकरूप असतात. 2. चौररसाचे कर्ण परस्परांना दुभागतात. 3. चौरसाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात.
2. आयत :-(Rectangle) ज्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनास आयत म्हणतात. आयताचे गुणधर्म:- 1. आयताच्या समुख बाजू एकरूप असतात. 2. आयताचे कर्ण एकरूप असतात. 3.आयताचे कर्ण परस्पराना दुभागतात. 3. समभुज चौकोन:-(Rhombus) ज्या चौकोनाच्या सर्व बाजु एकरूप असतात त्या चौकोनास समभुज चौकोन म्हणतात. गुणधर्म :- 1.समभूज चौकोनाचे कर्ण परस्पराना दूभागतात. 2.समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात .
3. समभुज चोकोनाचे संमुख कोन 👌 एकरूप असतात. 4. समांतरभुज चौकोन:- (parallelogram) ज्या चौकोनाच्या संमुख बाजु समांतर असतात, त्या चौकोनास समांतरभुज चौकोन म्हणतात . गुणधर्म:- 1.समांतरभुज चौकोनाच्या संमुख भुजा एकरूप असतात . 2. समांतरभुज चोकोनाचे संमुख कोन एकरूप असतात . 3.समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्पराना दुभागतात .
4. समलंब चौकोन:-.(trapezium) ज्या चौकोनाच्या संमुख बाजुंची केवळ एकच जोडी समांतर असते , त्या चौकोनाला समलंब चौकोन म्हणतात.
 5.पतंग:(kite) पतंगाच्या एकरूप बाजुंचे छेदनबिंदू जोडणारा कर्ण दुसरया कर्णाला काटकोनात दुभागतो.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा