व्यास

व्यास (भूमिती)
Disambig-dark.svg
हा लेख भूमिती विषयातील 'व्यास' नामक संकल्पना याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्यास.
वर्तुळातील व्यास

वर्तुळाच्या मध्य बिंदूमधून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदुना जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास (इंग्लिश: Diameter, डायमिटर) असे म्हणतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागांत दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्याच्या त्रिज्येच्या दुप्पट असते.

    d = 2 r . {\displaystyle d=2r.} {\displaystyle d=2r.}

व्यास ही वर्तुळाची सर्वांत मोठी ज्या होय. एखाद्या वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते.
वर्तुळाच्या अन्य गुणधर्मांशी संबंधसंपादन करा

त्रिज्येप्रमाणेच, वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परीघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. समजा :

    d = व्यास, c = परीघ, A = क्षेत्रफळ असेल, तर
    c = π . d {\displaystyle c=\pi .d\,} {\displaystyle c=\pi .d\,}
    A = π . d 2 4 {\displaystyle A={\frac {\pi .d^{2}}{4}}} {\displaystyle A={\frac {\pi .d^{2}}{4}}}

टिप्पण्या