पदावली

पदावली : नियम 1
जर दिलेल्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया सोडवावयाच्या असतील, तर कंचेभागुबेव या क्रमाने पदावली सोडवावी. म्हणजेच,
सर्वात प्रथम कंस सोडवावा.
कंस सोडविताना भागाकार, गुणाकार व नंतर बेरीज, वजाबाकी हा क्रम ठेवावा.
उदा. 25 + (12 × 15 ÷ 5 – 6) अशी पदावली आहे.
25 + (12 × 15 ÷ 5 – 6)
= 25 + (12 × 15 ÷ 5 – 6)
= 25 + (12 × 3 – 6)
= 25 + (36 – 6)
= 25 + 30
= 55
बीजगणितानुसार पदावली (मराठी लेखनभेद:
पदावलि [१] ; इंग्लिश: Expression , एक्सप्रेशन ;) म्हणजे गणिती चिन्हांची व बैजिक चिन्हांची सान्त रचना असते[१] . पदावल्यांच्या घटकांमध्ये स्थिरांक व चलांक इत्यादी गणिती चिन्हे/राशी, तसेच क्रिया व संबंध दर्शवणारी बैजिक चिन्हे मोडतात. पदावल्या अंकगणितातील एखाद्या सोप्या क्रियांपासून बनलेल्या असू शकतात, उदा.:
, किंवा चलांक, फल, क्रमचय , योगफल , विकलक व संकलक यांपासून बनलेल्या जटिल मांडण्या असू शकतात. उदा.:
सर्वसाधारणपणे पाहिल्यास पदावल्यांना सामान्य अंकगणितीय क्रियांचे संख्या, चल व गणितीय क्रिया या घटकांपासून बनवलेले सरलीकृत रूप मानता येईल. उदाहरणार्थ :
रेषीय पदावली: .
द्विघात पदावली: .
गुणोत्तरीय पदावली: .
गणितीय पदावलीच्या रचनेचे नियम न पाळता लिहिलेल्या बैजिक चिन्हांच्या व चलांच्या माळेस मात्र पदावली असे म्हणता येत नाही.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा