- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चार नैकरेषीय बिंदुना जोडून तयार झालेल्या भोमितीय आकृतीस चौकोन म्हणतात. चौकानाच्या कोनांची बेरीज ३६० अंश असते.
चौरस
प्रतलीय भूमितीमध्ये चारही बाजू समान लांबीच्या आणि चारही कोन एकरूप असणाऱया चौकोनाला चौरस असे म्हणतात. यामुळे चौरसाचा प्रत्येक कोन ९० अंशांचा असतो. प्रत्येक चौरस समांतर भूज चौकोन, समभूज चौकोन असतो. सर्व बाजू समान असल्यामूळे फक्त बाजू माहीत असल्यास चौरसाचे क्षेत्रफळ व परिमीति काढता येते.
आयत
ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समान व चारही कोन ९० अंशाचे असतात, अशा चौकोनाला आयत म्हणतात. आयताच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात म्हणून प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोनसुद्धा असतो. आयताचे क्षेत्रफळ व परिमिती काढण्यासाढी दोन संलग्न बाजू म्हणजेच त्याचा पाया आणि उंची माहीत असणे आवश्यक आहे.
समभुज चौकोन
ज्या चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात अशा चौकोनास समभुज चौकोन असे म्हणतात.समभुज चौकोनाच्या सर्व कोनांची बेरीज ३६० अंश असते ,परंतु या चौकोनाचे कोणतेही दोन किंवा अधिक कोन एकरूप नसू शकतात. समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन सूद्धा असतो.
समांतरभुज चौकोन
समांतरभुज चौकोन: ज्याच्या विरुद्ध बाजू या एकमेकांना समांतर असतात अशा चौकानाला समांतरभुज चौकोन म्हणतात.
समांतरभुज चौकोन
ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात त्याला समांतरभुज चौकोन असे म्हणतात.
समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म
१. समोरासमोरील बाजू समांतर असतात.
२. समोरासमोरील बाजू एकरुप असतात.
३. समोरासमोरील कोन एकरुप असतात.
४. कर्ण परस्परांना दुभागतात.
५. लगतचे कोन पुरक असतात.
आयत
जर समांतरभुज चौकोनाचा एक कोन 90º मापाचा असेल तर त्याला आयत असे म्हणतात.
आयताचे गुणधर्म
आयतामधे समांतरभुज चौकोनाचे सर्व गुणधर्म असतात. त्याखेरीज आयतामधे एक विशेष गुणधर्म असतो.
आयताचे कर्ण एकरुप असतात.
समभुज चौकोन
ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरुप असतात त्याला समभुज चौकोन असे म्हणतात.
समलंब चौकोन:या चौकोनात एक समांतर बाजूंची जोडी असते.
पतंग:या चौकोनात लगतच्या एकरूप बाजूंच्या दोन जोड्या असतात.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा